Breaking News

मुख्याध्यापक रमेश गोंधळी यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक रमेश गोंधळी यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या समारंभात श्री. व सौ. गोंधळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पनवेल मार्केटयार्ड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मुख्याध्यापक रमेश गोंधळी हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन तथा ‘रयत’चे जनरल बॅडी सदस्य जे. एम. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या संजीवनी म्हात्रे, ‘रयत’चे रायगड विभागीय अधिकारी संजय मोहिते, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, स्कूल कमिटी सदस्य मनोहर मुंबईकर, रमेश मोहोकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply