Breaking News

गरजूंसाठी सर्वदूर नेत्रसेवा अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ पनवेलने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम खेड्यापाड्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सर्वदूर नेत्रसेवा  हा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे.

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दूरदूरच्या खेड्यांपर्यंत उत्तम नेत्रसेवा पुरविणार्‍या या उपक्रमात मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन बरोबरच, मधुमेही रुग्णांसाठी डोळ्यांची तपासणी आणि त्यावरील उपचार, काचबिंदूसाठी डोळ्यांची तपासणी आणि त्यावरील उपचार तसेच 10,000 शालेय मुलांची डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप व इतर उपचार या सर्वांचा समावेश आहे. डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी टर्म गिफ्ट मधून आणि जर्मनी येथील एक रोटरी क्लब व आंतरराष्ट्रीय रोटरी फॉऊंडेशन यांनी दिलेल्या देणगीतून एकूण 70 लाख रुपयांचे हे अभियान उभे राहिले  आहे. सोमवार 3 फेब्रुवारीला या अभियानाची सुरुवात

मोतीबिंदू शत्रक्रियेने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या अत्याधुनिक रुग्णालयात करण्यात आली.

या वेळी बोलताना डॉ. सुहास हळदीपूरकर यांनी अशा  अभियानाची गरज अधोरेखित केली. तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष रो. सुनील लघाटे यांनी या अभियानामुळे जो हजारो रुग्णांचा फायदा होणार आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच ज्या डॉ. हळदीपूरकर यांच्यामुळे हे अभियान आकारास येत आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास सर्व रोटेरियन्ससह लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे कर्मचारीही उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply