Breaking News

पनवेलमध्ये गरजूंना मोती साबणाचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील युनीसेफ, हिंदुस्तान युनीलीवर आणि शेल्टर या संस्थांच्या माध्यमातून मोती साबणाचे वाटप प्रभाग क्रमांक 14 मधील एचओसी कॉलनी आदिवासी वाडी येथील नागरिकांना नगरसेवक मनोहर म्हात्रे व पनवेल कोळीवाडा येथे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पवन सोनी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, गणेश म्हात्रे, अजिंक्य दळवी, आंतिम, हरिश्चंद्र भगत, दत्ता पाटील यांच्या समवेत स्वच्छता निरीक्षक अनिकेत जाधव, ईश्वर झिंजोट व स्वच्छता दूत उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply