पनवेल : उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते रविवार दिनांक 18 ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
दुपारी 12 वाजता पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. यावेळी पनवेल मंडल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper