पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, मंगळवारी (दि. 20) नव्या 181 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 266 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 40) तालुक्यातील 124, अलिबाग 15, पेण 11, पोलादपूर आठ, खालापूर सहा, रोहा पाच, मुरूड चार, उरण, कर्जत व माणगाव प्रत्येकी दोन, सुधागड व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात आठ, रोहा तीन आणि खालापूर, अलिबाग, सुधागड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,371 आणि मृतांची संख्या 1488 झाली आहे. जिल्ह्यात 48,869 जण कोरोनामुक्त झाल्याने 2014 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…
एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …
RamPrahar – The Panvel Daily Paper