Breaking News

किकबॉक्सिंगमध्ये हर्षदा, पंक्तीला पदक

पनवेल : वार्ताहर

पुणे बालेवाडी वाको इंडिया किकबॉक्सिंग असोसिएशनने आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन चषक स्पर्धेत रायगड जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडू हर्षदा मोकल हिने पॉईंट फाईट या प्रकारात रौप्यपदक व लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात कांस्यपदक; तर पंक्ती पाठक हिने पॉईंट फाईट या प्रकारात कांस्यपदक पटकावून रायगडसह महाराष्ट्राचे नाव उंचावले.हर्षदा व पंक्ती खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण शाळेत चिंतामणी मोकल, प्रतिक कारंडे यांच्याकडे किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. या यशाबद्दल त्यांचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया आणि रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर आणि सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply