Breaking News

संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख!; चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

पुणे : प्रतिनिधी

जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्य ा वर्षांनंतर या जगांमध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून, त्यांच्याकडे फक्त भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगातील विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. पुण्यातील बोपोडी येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपवर टीका करणे, ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत, मात्र इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही. त्यांना लगेच टोचते. पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केले आहे. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेने मान्य केले असल्याचे म्हटले.  बेळगाव येथील गावांचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, तेथील अनेक गावांत कन्नड भाषिक अधिक आहेत. ती गावे स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये गेली आहेत. अशी 800 गावे आहेत. त्यामुळे बेळगावसहित 800 गावे महाराष्ट्रात आली पाहिजेत ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.

Check Also

खारघर येथे रक्तदान महाशिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही दिले योगदान

खारघर ः रामप्रहर वृत्तश्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply