Breaking News

दिलासादायक! ऑक्टोबरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत 30% घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर रुग्णांच्या संख्येत घट समोर आली आहे. आकड्यांनुसार ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 30 टक्क्यांनी कमी आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून घट दिसून येत होती. याचा परिणाम ऑक्टोबरच्या आकड्यांवरही झाला. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात घट झालेली दिसून आली आहे. ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात 18.3 लाख केसेस समोर आल्या होत्या. सप्टेंबरमध्ये ही संख्या 26.2 लाख इतकी होती. या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी दिसून आली. ऑक्टोबरमध्ये जवळपास 23,500 लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला. ही संख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 29 टक्के कमी आहे. सप्टेंबरमध्ये 33,255 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रविवारी कोरोना व्हायरसचे 46,964 रुग्ण समोर आले असून, आता एकूण रुग्णसंख्या वाढून 81,85,083 इतकी झाली आहे. देशात मागच्या 24 तासांत 47 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा वाढून 1,22,111वर पोहचला. भारतात आतापर्यंत 74,91,513 रुग्ण कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 5,70,458 लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply