Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. या कार्यालयामुळे चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना आता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सहाय्यक गटविकास अधिकारी लता मोहिते, भाजप ओबीसी सेल रायगड जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, भाजप तालुका खजिनदार शिवाजी दुर्गे, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर, उपसरपंच नरेश सोनावळे, सर्व सदस्य, ग्रामसेवक, माजी उपसरपंच शांताराम कुंभारकर, अनंता कडू, रघुनाथ फराड, वाकडीचे माजी सरपंच नामदेवशेठ जमदाडे, नरेश पाटील, तोंडरेचे माजी सरपंच राम पाटील, शिरवलीचे सरपंच दीपक बोंडे, माजी सरपंच तुकाराम पाटील, खानावचे माजी सरपंच लहूशेठ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान कडू, नामदेव पाटील, राजेंद्र पाटील, अशोक साळुंखे, हरिश्चंद्र पाटील, धनाजी म्हात्रे, भालचंद्र सिनारे, युवा नेते एकनाथ मुंबईकर, प्रकाश खैरे, अंकुश पाटील, मनोहर अरिवले, दीपक उलवेकर, वावंजे जि. प. विभागीय रवींद्र पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply