Breaking News

रायगडात 66 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, रविवारी (दि. 8) नव्या 66 कोरोना रुग्णांची आणि एक जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 116 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 31 व ग्रामीण 16) तालुक्यातील 47, अलिबाग पाच, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, उरण, पेण व माणगाव प्रत्येकी दोन, सुधागड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत झालेला रुग्ण उरण तालुक्यातील आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,911 आणि मृतांची संख्या 1572 झाली आहे. आतापर्यंत 52,181 जण कोरोनामुक्त झाल्याने 1158 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

कबड्डी खेळाडूंना स्पोर्ट्‌‍स किट्सचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पुरुष व …

Leave a Reply