पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेगणिक घटत असून, सोमवारी (दि. 9) नव्या 76 कोरोना रुग्णांची आणि चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 161 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 35 व ग्रामीण 29) तालुक्यातील 64, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, उरण व रोहा प्रत्येकी दोन, कर्जत व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत झालेले रुग्ण पनवेल तालुक्यातील दोन आणि खालापूर तालुक्यातील एक आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,987 आणि मृतांची संख्या 1575 झाली आहे. आतापर्यंत 52,342 जण कोरोनामुक्त झाल्याने 1070 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper