माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा आणि रॉयल टायगर असोसिएशनच्या वतीने आदई सर्कल येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या वाचनालयाचे लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, बुवाशेठ भगत, आकुर्ली सरपंच सचिन पाटील, सदस्य राजेश पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, युवा नेते शेखर शेळके, प्रवीण मोहोकर, भगवान भगत, प्रमोद भगत, विकास तलेकर, रॉयल टायगर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल लोहकेर, ऋषिकेश कदम, ऋषिकेश शिंदे, प्रवीण जाधव, श्रीनाथ ठाकुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या वेळी पाली देवद ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याबद्दल  लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply