पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) नवे 98 कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, तर 97 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 17) तालुक्यातील 77, अलिबाग नऊ, कर्जत व पेण प्रत्येकी तीन, उरण व महाड प्रत्येकी दोन आणि खालापूर व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 55,727 आणि मृतांची संख्या 1588 झाली आहे. आतापर्यंत 53,257 जण कोरोनामुक्त झाल्याने 882 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper