Breaking News

खांदेश्वर मंदिर उद्यानात बैठक व्यवस्थेच्या कामाचे भूमिपूजन

संजय भोपी यांच्या नगरसेवक निधीतून होणार काम

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनीमधील उद्यानात बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत असे. स्थानिक नगरसेवक व माजी प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती संजय भोपी यांनी नगरसेवक निधीतून उद्यानांमध्ये बसण्यासाठी चावडी बांधून देणेबाबतची मागणी महानगरपालिकेला निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला मान्यता देत बुधवारी (दि. 18) खांदेश्वर मंदिर उद्यान व सेक्टर 9 येथील उद्यानामध्ये संजय भोपी यांच्या नगरसेवक निधीतून चावडी बनविण्याच्या कामाचे भूमिपूजन निवृत्त पोलीस उपअधीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले.

या वेळी नगरसेवक संजय भोपी यांच्यासमवेत, भाजप रायगड जिल्हा सदस्य भिमराव पोवार, आरबीआयचे निवृत्त अधिकारी विठोबा बनसोडे, रवि सरगर, पी. सी. कदम, सुधीर भदौरिया, मॉर्निंग योगा ग्रुपचे सुभाष गावडे, सुरेश म्हात्रे, अरुण म्हसकर, श्री. नाडर, आझाद ज्येष्ठ नागरीक संस्थेचे पंडित, श्री. कालन, श्री. शिरसाठ, भैरू कांबळे व इतर सदस्य, भारतीय धनगर परिषदेचे अध्यक्ष श्रीरंग वळकुंडे, संजय भोपी प्रतिष्ठानचे नवनाथ मेंगडे, रमण तोरसकर, अभिषेक भोपी, शरद मिसाळ, रोशन सोनी, रोहन व्हटकर, गणेश पाटील, सचिन सातपुते, सिद्धेश गाढवे व इतर सदस्य उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply