Breaking News

मुरूडमध्ये सुरू होणार भात खरेदी केंद्र

किसान क्रांती संघटनेच्या मागणीला यश

मुरूड ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण 35 भात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असता नेमके मुरूडला वगळण्यात आल्याची वस्तुस्थिती किसान क्रांती संघटनेने तहसीलदारांना 2 नोव्हेंबरच्या निवेदनाद्वारे निर्दशनास आणून देत भात खरेदी केंद्र मंजूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी येत्या आठ दिवसांत जिल्हा पणन अधिकार्‍यांना मुरूड तालुक्यासाठी भात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे शेतकर्‍याने कष्टाने पिकवलेल्या भाताला दलालांकडून वर्षानुवर्षे अल्प किमतीत खरेदी करण्याच्या कृतीला आळा बसणार असून शेतकर्‍याला किमान हमीभाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply