Breaking News

वडघर येथील टेम्पो स्टँडचे उदघाट्न

50 टेम्पोचालकांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपप्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 4) वडघर येथे नव्याने टेम्पो स्टँड सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निर्गुण कवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्टँडला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली.
भाजपप्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने शुक्रवारी वडघर येथे नव्याने टेम्पो स्टँड सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 50 टेम्पोचालकांनी उबेद पवार व शावेझ रिझवी यांच्यावर विश्वास ठेवून तसेच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाचा समारोप करताना शावेझ रिझवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तसेच सर्व पाहुण्यांचे आभार मानून पुढे असेच कार्यकर्ते व वाहतूकदार जोडण्याचा विश्वास व्यक्त केला.
या वेळी स्थायी समिती सदस्य नगरसेवक मुकीद काझी, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस उबेद पवार, उपचिटणीस शावेझ रिझवी, भाजप वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, युवा नेते जव्वाद काझी, पनवेल नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे अध्यक्ष इस्माइल मुल्ला, मुन्ना अन्सारी, महिला मोर्चाच्या समीना साठी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply