Breaking News

आमदारांनी दिली महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या विक्री मेळाव्याला प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संस्थेच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल लघुउद्योजक व बचत गटातील महिलांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद दिले. दरम्यान, या विक्री मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रविवार (दि. 14)पर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्यावतीने पनवेलमधील गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत उद्योगिनी, लघुउद्योजक, व बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी पनवेलमधील गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 14 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल शहर अध्यक्षा तथा नगरसेविका मुग्धा लोंढे, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वाती कोळी, अंजली इनामदार, सुनीता खरे, उज्ज्वला पटवर्धन, समृद्धी जोग, गीता चौधरी, जयश्री पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रदर्शन व विक्री मेळाव्याला महापौर डॉ. कविता चौतमोल, आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply