रसायनी : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 14) मराठा समाज बांधव व भगिनी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येऊन आरक्षणासाठी पुढील दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मराठा समाज आंदोलकांची नाकाबंदी करण्यात येत आहे. रविवारी (दि. 13) विविध मार्गांवर पोलीस प्रत्येक गाडीची पाहणी करताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने मराठा समाजाच्या नेत्यांच्या गाडीचे क्रमांक घेऊन त्या गाड्या अडविण्यात आल्याचा आरोप खोपोलीतील मराठा समाज नेते सुनील पाटील यांनी केला, तर काही कार्यकर्ते गनिमी कावा करून आझाद मैदानात पोहचले असल्याचे रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांनी भ्रमणध्वनीवर बोलताना सांगितले.
Check Also
भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …
RamPrahar – The Panvel Daily Paper