Breaking News

पर्यटनांसंबंधी गोष्टी खुल्या

मुंबई ः प्रतिनिधी
राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळी कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अ‍ॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स पुन्हा सुरू होणार आहेत.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरेमंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन व्यथा मांडल्या होत्या तसेच व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर शासनाने त्यास परवानगी दिली आहे.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply