Breaking News

अलिबागमध्ये शेतकरी संवाद अभियान; पंकजा मुंडेंची उपस्थिती

अलिबाग ः देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त पोयनाड येथे शेतकरी संवाद अभियान अंतर्गत कार्यक्रम झाला. या वेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार रविशेठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, हेमंत दांडेकर, राजेश मापारा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश लेले, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply