पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 30) स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजूरी देण्यात आली. या सभेत नियमीत खर्चाची व विकासकामांची देयक अदा करण्यासाठी मुदतसाठी मुदतपूर्व वटविणे, आणि सण 2020-21 व 2021-22 वित्तीय वर्षासाठी पनवेल महापालिकेमार्फत साजरे करण्यात येणार्या उत्सव समारंभाकरिता लागणारे मंडप खुच्या बॅरीकेट्स व इतर निविदा पत्रकात नमुद केलेले साहित्य पुरविणे बाबत चर्चा करुन या विषयांना स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली. या सभेला महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, प्रवीण पाटील, मुकीद काझी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.