Breaking News

खारघर गावात राम मंदिर उभारणीच्या जनजागृतीसाठी दिंडी

पनवेल : प्रतिनिधी

खारघर गावात स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक  प्रवीण पाटील यांनी शुक्रवारी (दि. 15) अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर उभारणीसाठी निधी गोळा करण्यासाठी दिंडी काढून जनजागृती केली.

अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून पनवेल महापालिका क्षेत्रात निधी समर्पण अभियान सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खारघर गावात सेक्टर 13 मध्ये जनजागृती करण्यासाठी स्थायी समितीचे माजी सभापति  नगरसेवक प्रवीण पाटील यांनी दिंडी शुक्रवारी सकाळी 11 वाजता दिंडी काढली होती .

प्रवीण पाटील यांच्यासह खारघर तालुका मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, बिना गोगरी, अजित नायर, राजेंद्र आगरवाळ, नरेंद्र शर्मा, राम कुमार, वैशाली प्रजापती, लहू (महाराज) कडू, गणू घरत, नारायण फडके, सावळाराम भोईर, प्रमिला घरत, विशाल नाईक, मेघनात म्हात्रे, महेश भोईर, संदीप पाटील या दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी तनया घरत व आज्ञा घरत यांनी श्रीराम आणि सीतेची वेशभूषा केली होती.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply