Breaking News

सांघिक कामगिरीमुळे ऐतिहासिक विजय; कर्णधार रहाणेकडून सहकार्‍यांचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळविले. नवख्या खेळाडूंच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर भारतीय संघानंतर कसोटी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. कसोटी मालिकेवर नाव कोरल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने सांघिक कामगिरीच्या बळावर आपण यश संपादन केल्याचे म्हटले आहे. ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रहाणेने आपल्या संघाला दिलेल्या भाषणाचा व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)पोस्ट केला आहे. यामध्ये अजिंक्य रहाणे कसोटी मालिकेतील प्रत्येक क्षणावर भाष्य करीत असल्याचे दिसत आहे. ‘ही एक सांघिक कामगिरी आहे. कोणत्याही एका खेळाडूमुळे आपण हा ऐतिहासिक विजय मिळवू शकलो नाही. आपल्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे आणि तो पुरेपूर एन्जॉय करा, असा मेसेज भारतीय संघातील खेळाडूंना रहाणेने दिला. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि कुलदीप यादव यांचेही रहाणेने कौतुक केले. कुलदीपला एकही सामना खेळायला मिळाला नाही, मात्र नेटमध्ये त्याने पूर्ण तयारी केली होती. अशीच मेहनत घेत राहा. तुझीही वेळ येईल, असा आत्मविश्वास राहणेने वाढवला.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply