Breaking News

सभापतीसह नगरसेवकांकडून खारघरमधील उद्याने, मैदाने आणि तलावांची पाहणी

अधिकार्‍यांना दिल्या सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघरमधील उद्याने, खेळाची मैदाने व तलावांची पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 29) पाहणी केली. या वेळी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

सिडकोच्या वतीने महापलिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानुसार या मैदानात आणि उद्याने तसेच खारघरमधील तलावे विकसीत तसेच अनेक सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह नगरसेवकांनी खारघर मधील उद्याने, खेळाची मैदाने आणि खारघर श्री समर्थ तलावाची अधिकार्‍यांसह पाहणी करून या संदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी प्रभाग समिती ‘अ‘ सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, वासुदेव पाटील, समीर कदम, महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply