Breaking News

राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

नाट्य-सिने क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. 31) सायं. 5 वाजता होणार आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्‍या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असून, प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक व 99व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी उपस्थित राहणार आहेत.
 या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेल प्रदेक्षाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, जयंत वाडकर, लेखक, दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सकाळी 9 वाजल्यापासून अंतिम फेरीतील उर्वरित सहा एकांकिकांचे सादरीकरण होणार असून, एकांकिका तसेच पारितोषिक वितरण सोहळ्याला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply