Breaking News

पाटणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची ग्वाही

पेण : प्रतिनिधी 

श्री क्षेत्र पाटणेश्वर देवस्थानासाठी काम करू तेवढे कमीच आहे. त्यामुळे पाटणेश्वर क्षेत्राचा विकास या पुढेही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. येथील रस्त्याचे  काम आणि तलाव सुशोभीकरणासाठी आमदार निधीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी येथे केले. पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पाटणेश्वर येथील मंदिरापर्यंतचा रस्ता खराब झाला असून त्याच्या डांबरीकरणाचे काम त्वरीत सुरू होणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, राजू पिचिका, ललित पाटील, विकास पाटील, मंदाताई म्हात्रे, जयश्री म्हात्रे, माजी सरपंच किशोर म्हात्रे, राजू पाटील आदींसह पाटणेश्वर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply