Breaking News

बीएसएनएलला साडेतीन लाखांचा दंड

नेरळ-कळंब रस्त्याच्या साइडपट्टी खोदकामप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्यालगतची साईडपट्टी खोदून बीएसएनएलची केबल टाकली जात आहे. या रस्त्याची मालकी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विनापरवाना खोदकाम केल्या प्रकरणी  बीएसएनएलला साडे तीन लाखाचा दंड आकारला आहे.

माथेरान-कळंब राज्यमार्गावरील नेरळ-कळंब भागात रस्त्याच्या बाजूने बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी साइडपट्टी खोदण्यात येत असल्याचे कोल्हारे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय हजारे यांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच याबाबतचे वृत्त ‘दै. रामप्रहर’मध्ये बुधवारी (दि. 10) प्रसिध्द झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी रस्त्याची पाहणी केली आणि विनापरवाना करण्यात येत असलेले खोदकाम तत्काळ बंद करण्याबाबत वारंवार तोंडी आणि लेखी कळविले होते. मात्र साइडपट्टी खोदण्याचे काम सुरुच  होते. त्यामुळे बीएसएनएलला विनापरवाना खोदकाम प्रकरणी तीन लाख साठ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करण्याचे आदेश उपविभागीय अभियंता सर्वगोड यांनी दिले. तसेच परवानगी घेऊनच पुढील खोदकाम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply