Breaking News

शिवरायांची आकर्षक मूर्ती नागरिकांना देणार भेट

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा शिवजयंतीनिमित्त अनोखा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिवजयंती निमित्त भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात येत आहे. प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा करून आपला श्रद्धाभाव व्यक्त करू शकतील. हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या शिवजयंती निमित्त खास किल्ले रायगडावरून आणल्या जाणार्‍या शिवज्योतचे दर्शन नागरिक घेऊ शकतील. तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या या उत्सवास नागरिकांनी शुक्रवारी (दि. 19) पनवेलमधील विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आवश्य भेट द्यावी, असे आवाहन विक्रांत पाटील यांनी केले आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply