महाड ः प्रतिनिधी
महाडमधील तरुण नेतृत्व व यशस्वी उद्योजक संकेत उर्फ नाना पोरे यांनी शनिवारी
(दि. 27) आपल्या सहकार्यांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाड तालुक्याचा रखडलेला विकास, शिक्षण, आरोग्य आणि तरुणांचे प्रश्न सेडविण्यासाठी स्थानिक नेतृत्व कमी पडत असून आता महाडचा तरुणवर्ग नव्या पर्यायाच्या शोधात आहे. त्या अनुषंगाने महाडमधील तरुणांचे नेतृत्व करणारे संकेत उर्फ नाना पोरे यांनी आपल्या सहकार्यांसह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांच्यासह निकेत पोरे, मिलिंद पारखे, सुहास टमके, महेश नागावकर, अतुल चित्रे, शरद सापळे यांनीदेखील भाजपत प्रवेश केला. दरम्यान, या तरुणांना विश्वास देत आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, आज तरुणवर्ग खर्या अर्थाने मोठ्या संख्येने भाजपसोबत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासपर्वाचा आजचा तरुण एक भाग होऊ पाहत आहे. या वेळी महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, उपशहराध्यक्ष निलेश तळवटकर, तुषार महाजन आदी उपस्थित होते.
Check Also
पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील …
RamPrahar – The Panvel Daily Paper