Breaking News

शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल कमिटीच्या चेअरमनपदी सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पुष्पक नोड उलवा येथील शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई नियोजित विद्यालयाच्या स्कूल कमिटी चेअरमनपदी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.  
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचा समाजकार्याचा आदर्श घेऊन सभागृह नेते परेश ठाकूर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करीत आहेत. सतत माणसात राहून कार्य करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. विविध क्षेत्रांत काम करीत असताना शैक्षणिक क्षेत्रातही ते स्वतःला झोकून देत कार्य करतात.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावात सभागृह नेते परेश ठाकूर यांची निवड पुष्पक नोड उलवा येथील शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई या नियोजित विद्यालयाच्या स्कूल कमिटी चेअरमनपदी करण्यात आली आहे. या संदर्भात रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय निरीक्षक एस. जी. मोहिते यांनी निवडपत्र देऊन रायगड विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply