Breaking News

रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली असून, देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लोकांसाठी या अंतर्गत लस देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मंगळवारी
(दि. 2) कोरोना लस घेतली. याबाबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांनी माहिती दिली.
’आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकीय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्याने जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो,’ असे आपल्या पोस्टमध्ये शास्त्री यांनी लिहिले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply