नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याला सुरुवात झाली असून, देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त अशा लोकांसाठी या अंतर्गत लस देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही मंगळवारी
(दि. 2) कोरोना लस घेतली. याबाबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांनी माहिती दिली.
’आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकीय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले, त्याने जगभरात देशाची मान आणखी उंचावली गेली. या सर्वांचे आभार मानतो,’ असे आपल्या पोस्टमध्ये शास्त्री यांनी लिहिले आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …