Breaking News

कर्जतमध्ये 550 मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी

भारत विकास परिषदेचे सेवाकार्य

पनवेल ः प्रतिनिधी

भारत विकास परिषदेची पनवेल शाखा आणि एमपॉव्हर इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील कशेळे गावात मुलींसाठी मोफत हिमग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात आदिवासी पाडे तसेच दुर्गम पाड्यांमधील गोरगरीब मुलींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. 11 ते 19 वयोगटातील 550 मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला. 

सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क या गोष्टींची खबरदारी घेऊन आसपासच्या वस्त्यांमधून या मुलींना शिबिराच्या ठिकाणी आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी शाळेतील शिक्षकवर्गाने साह्य केले. सर्व मुलींना जंत व रक्तवाढीच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मुंबई येथील सैफी रुग्णालयाच्या डॉक्टर व इतर कर्मचारीवर्गाने यासाठी मदत केली.

शिबिराला रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते. भारत विकास परिषदेतर्फे ज्योती कानिटकर, पद्मजा कुलकर्णी, ज्योती कोळी व डॉ. कीर्ती समुद्र यांनी शिबिराचे यशस्वी नियोजन केले.

भारत विकास परिषदेने अ‍ॅनिमियामुक्त भारत हे आरोग्यदायी अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी, दुर्गम पाडे, मागास व गोरगरीब वस्त्यांमधे हा उपक्रम राबविला जात आहे. 

  -डॉ. कीर्ती समुद्र, भारत विकास परिषद, पनवेल

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply