रत्नागिरी ः रत्नागिरीत लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीमध्ये शनिवारी (दि. 20) सकाळी स्फोट होऊन चार कामगार मृत्युमुखी पडले, तर एक जण जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरडा कंपनीत 7 नंबरच्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली आणि परिसरात धुराटे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकाही पाठविण्यात आली होती. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी लोटे एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत स्फोट झाला होता.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper