Breaking News

उरणच्या कळंबुसरेजवळ रस्ता खचला; अपघाताची शक्यता; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

उरण : प्रतिनिधी

चिरनेर-कोप्रोली-आवरे रस्त्यावरील कळंबुसरे स्मशानभूमीजवळील मोरीवर रस्ता खचला आहे. या खचलेल्या रस्त्याला मोठे भगदाड पडले असूनही सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने उरणच्या पूर्व भागात अनेक सीएफएस एमटी यार्ड गोडाऊन वसले आहे. त्यामुळे या चिरनेर-कोप्रोली मार्गावर अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे. या अवजड वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले गेले आहेत. येथील होणार्‍या अवजड वाहूतुकीच्या अनुषंगाने या भागातील रस्ते खचले जात आहे. अनेक ठिकाणी भगदाड पडत आहे. या खचलेल्या रस्त्यावर एक मोठे भगदाड निर्माण झाले असून त्याची पाहणी केल्यावर रस्त्याच्या अस्तित्वाची दाहकता दिसून येत आहे. याची कल्पना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना नसणे ही मोठी खेदाची गोष्ट आहे. यावरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आपल्या रस्त्यांवर किती लक्ष देते हे कळून येतेे. या खचलेल्या रस्त्यावर तत्काळ डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्य नाकारता येत नाही.

ज्या रस्त्यावर भगदाड पडले असेल, त्याची पाहणी करून  हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात येईल. -आर. के. बामणे, कार्यकारी अभियंता

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply