Breaking News

पनवेलमधील रेस्टॉरंट्स, बारसाठी नवे निर्बंध

पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रेस्टॉरंट्स, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी येथे सायंकाळी 7 वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याबाबतचे निर्देश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 26) दिले आहेत.
महापालिका हद्दीत खासगी आस्थापना व मॉल्ससह सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच अन्य दिवशी या सेवा 50 टक्के क्षमतेसह रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रदान करणार्‍या आस्थापना तसेच दुकानांना या प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेकडून घालण्यात आलेल्या या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही मनपा प्रशासनाने दिला आहे.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply