पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नॅपशॉट्स फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021मध्ये तब्बल 1113 स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरूपात व खुल्या गटात तसेच पनवेल महानगरपालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा होती. प्रगतिशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार विषयांवर आधारित या स्पर्धेत कॅमेरा फोटोग्राफी विभागात 382, तर मोबाईल फोटोग्राफी विभागात 731 अशा एकूण 1113 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 30 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून, स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याबद्दल कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पर्धकांचे आभार व्यक्त केले आहेत.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper