पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा येथील पाणी साठणार्या भुयारी मार्गाची तसेच कब्रस्तान व नाल्याची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 31) पाहणी केली.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अनेक समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याचे काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाकूर यांनी बुधवारी तळोजा येथील भुयारी मार्गाची, तसेच कब्रस्तानची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी तळोजा येथे शिवजयंत्तीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप नेते निर्दोश केणी, संतोष पाटील, जगदिश घरत, विवेक केणी, जयंत घरत, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …
RamPrahar – The Panvel Daily Paper