Breaking News

मनपा सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून तळोजात भुुयारी मार्ग, कब्रस्तानची पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा येथील पाणी साठणार्‍या भुयारी मार्गाची तसेच कब्रस्तान व नाल्याची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 31) पाहणी केली.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अनेक समस्यांची पाहणी करून त्या सोडविण्याचे काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ठाकूर यांनी बुधवारी तळोजा येथील भुयारी मार्गाची, तसेच कब्रस्तानची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी तळोजा येथे शिवजयंत्तीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप नेते निर्दोश केणी, संतोष पाटील, जगदिश घरत, विवेक केणी, जयंत घरत, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply