Breaking News

शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बाल वैज्ञानिक स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यम विभागातर्फे बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना बालवयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक द़ृष्टिकोन वाढावा या उद्देशाने ही स्पर्धा पनवेल तालुक्यातील सर्व शाळांकरिता घेण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याध्यापक आणि स्पर्धेचे आयोजक संतोष चव्हाण यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.
इयत्ता पाचवी ते सहावी गटासाठी घोषवाक्य स्पर्धा आहे. या स्पर्धेत सादर करण्यात येणारे घोषवाक्य अचूक आणि योग्य संदेश देणारे असावे. भाषा माध्यम इंग्रजी आणि मराठी चालेल. घोषवाक्य विषयाला अनुसरून असावे. आपल्या कामाची विशेषता अधोरेखित करावी. जिथून स्लोगन घेतले आहे, त्याचे नाव स्पष्ट करावे. घोषवाक्य 25 शब्दमर्यादेत असावे. एक विद्यार्थी एकच घोषवाक्य प्रवेशिका पाठवेल. एक शाळा अनेक प्रवेशिका पाठवू शकते.
घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक दोन हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक 1500 रु. व चषक, तृतीय क्रमांक एक हजार रु. व चषक आणि उत्तेजनार्थ दोन चषक आहेत. आपल्या प्रवेशिका सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम येथे 10 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत प्रकाश रिसबूड यांच्याकडे जमा कराव्यात. तत्पूर्वी सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याने 10 एप्रिलपूर्वी https://forms.gle/BvVWYFxKuKeLRTPt5 या लिंकवर नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रकाश रिसबूड (8097123225), महेश पोपेटा (8082064599) यांच्याशी संपर्क साधावा.
इयत्ता सातवी ते आठवीसाठी घेण्यात येणार्‍या भित्तीपत्रके स्पर्धेकरिता पेपरचा आकार ए 3 साइझ असावा. पेपर चार्ट वा ड्रॉइंग पेपर चालेल. रंग वॉटर वा पोस्टर वापरावेत. भित्तीपत्रक विषयानुसार व सामाजिक संदेश देणारा असावे. एक विद्यार्थी एकच भित्तीपत्रक प्रवेशिका पाठवेल. एक शाळा अनेक प्रवेशिका पाठवू शकते. भित्तीपत्रके स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक दोन हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक 1500 रु. व चषक, तृतीय क्रमांक एक हजार रु. व चषक आणि उत्तेजनार्थ दोन चषक आहेत. आपल्या प्रवेशिका सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम येथे 10 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत महेश पोपटा यांच्याकडे जमा कराव्यात. तत्पूर्वी सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याने 10 एप्रिलपूर्वी https://forms.gle/YbrcUR1QaEfNy6LLA या लिंकवर नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी प्रकाश रिसबूड (8097123225), महेश पोपटा (8082064599) यांच्याशी संपर्क साधावा. 
इयत्ता नववी ते दहावी या गटासाठी शोध निबंध स्पर्धा होणार असून, त्याकरिता ए 4 आकाराचा पेपर वापरावा. शब्दमर्यादा दोन हजार शब्द आहे.  प्रत्येक शाळाकेवळ एक प्रवेशिका (एक गट) पाठवेल आणि गटामध्ये कमीत कमी दोन विद्यार्थी आणि जास्तीत जास्तचार विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. प्रकल्प हा शिर्षक… अनुक्रमाणिका, प्रस्तावना, प्रकल्प पद्धत व वेळमर्यादा, शोध, निकाल, आलेख तक्ता, निष्कर्ष, स्पर्धकाचे नावे आणि मार्गदर्शक शिक्षकाचे नाव, संदर्भ अशा प्रकारे असावा.
शोध निबंध स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पाच हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक तीन हजार रु. व चषक, तृतीय क्रमांक दोन हजार रु. व चषक आणि उत्तेजनार्थ दोन चषक आहेत. आपल्या प्रवेशिका सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम येथे 10 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत जॉन्सन मॅडम (9869337902) यांच्याकडे जमा कराव्यात. तत्पूर्वी सहभागी होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याने 5 एप्रिलपूर्वी https://forms.gle/JtjjJrJvTS1AnTHE9 या लिंकवर नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी विश्वास कोरडे (9819227596), उज्ज्वला सिमरया (8976876341) यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, कोणतेही चालू कार्यरत किंवा बंद मॉडेल्स उपकरणे/आकृतिबंध जमा करण्याची आवश्यकता नाही. गुगल फॉर्म रजिस्ट्रशनची लिंक पाठविण्यासाठी आपल्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षकाचे नाव आणि मोबाइल नंबर पाठवावा, जेणेकरून लिंक पाठवता येईल, असेही सीकेटी विद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
असे आहे स्पर्धेचे स्वरूप
स्पर्धा तीन गटांत व प्रकारांत घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते सहावीसाठी घोषवाक्य, सातवी ते आठवीसाठी भित्तीपत्रके तयार करणे आणि नववी ते दहावीसाठी शोधनिबंध सादर करणे अशी स्पर्धा असणार आहे. यासाठी ऊर्जा, आरोग्य आणि कोविड-19 आणि पारंपरिक माहिती स्रोत असे विषय आहेत. विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply