Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतनाचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे थोर समाजसेवक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्त मंगळवारी (दि.२) त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, साहित्य, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभीष्टचिंतन करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
समाजसेवा, दातृत्व, नेतृत्व आणि लोककल्याणाचा अखंड वसा जपत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या जीवनातील ७५ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. गरजू, वंचित आणि कष्टकरी घटकांना आधार देत शिक्षण, आरोग्य आणि समाजविकासासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे.
साधेपणा, विनम्रता आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मियतेमुळे लोकनेते रामशेठ ठाकूर हे केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे सच्चे लोकनेते म्हणून ओळखले जातात. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून समाजसेवेच्या या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन झाले. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे भव्य स्वरूपात हा सोहळा झाला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जात, पात, धर्म, पक्ष असा कधीही भेदभाव मानला नाही. आपल्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आणि माणुसकी हाच त्यांचा धर्म कायम राहिला आहे. त्यामुळे त्यांची लोकांप्रती असलेली समर्पण भावना खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे पान आहे. त्यांची कीर्ती महान आणि सर्व समाजाला मार्गदर्शक आहे. म्हणूनच सर्वसामान्यांचे आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची हजारोंच्या संख्येत अर्थात अफाट गर्दी केली होती.
दरम्यान, अमृत महोत्सवी वर्ष प्रचंड प्रमाणात विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरे झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्यातील मंत्रीमहोदय गणेश नाईक, भरत गोगावले, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे तसेच कोकणातील आमदार आणि विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि दहा हजारहून नागरिक हितचिंतकांच्या उपस्थितीत (१३ मे) लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा उलवे नोडमध्ये भव्य असा अभीष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
याचबरोबर वर्षभरात झालेल्या कार्यक्रमात भव्य कीर्तन महोत्सव, जिल्हास्तरीय भजन स्पर्धा, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, महिलांसाठी कर्करोग तपासणी विशेष शिबिर, रोजगार मेळावा, शिधा वाटप, नाट्य महोत्सव, वृक्षारोपण, ७५ अभंगांचे लोकार्पण, आगरी कोळी महोत्सव, श्रीरामार्पण सांस्कृतिक सोहळा, संगीत मॅरेथॉन, व्याख्याने, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, अभिनय स्पर्धा, कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान सोहळा, सामूहिक बासरी वादन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, प्रोग्रॅम कार्ड डेकोरेशन, राज्यस्तरीय निवड कबड्डी स्पर्धा आणि प्रशिक्षण, विमा पॉलिसी वाटप, बॅडमिंटन स्पर्धा, बॉक्सिंग स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, अशी विविध कार्यक्रम उत्कृष्ट आयोजनात पार पडले. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम झाल्याने अमृत महोत्सवी वर्षाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित झाले.

Check Also

मुझे कुछ कहना है @25 वर्षे

कपूर आणि कपूर पुन्हा कपूर आणि कपूर अधूनमधून स्टारपुत्राचे चित्रपट पडद्यावर येण्याचे दिवस असतात. लाट …

Leave a Reply