पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. लि.च्या वतीने अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि.१) करण्यात आले होते. दैनिक रामप्रहरच्या कार्यालयात हा सोहळा अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात झाला.
या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, नगरसेवक सुमित झुंजारराव, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, मल्हार नेटवर्क प्रा. लि.चे संचालक स्वप्नील ठाकूर, दै. रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्त संपादक समाधान पाटील, उपसंपादक नितीन देशमुख, सुधाकर जगताप, मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, सुबोध ठाकूर, लेखापाल उद्धव घरत, वितरण विभागाचे महेश काळे, करण वाहुळकर, मल्हार चॅनेलचे संपादक नितीन कोळी, श्रीगणेश धुमाळ, विशाल पाटील, अविनाश डोयरिया, योगेश पाटील, विकास म्हात्रे, अक्षय शार्दूल, प्रफुल्ल कांबळे, पत्रकार प्रकाश सोनावडेकर, हरिभाऊ देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी संपादित केलेल्या ‘रामशेठ नाबाद ७५’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘रामप्रहर’च्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत समाधान व्यक्त केले.
Check Also
पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा
२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
RamPrahar – The Panvel Daily Paper