पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी (दि.३) वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू होते. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबियांसह सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
कान्हाशेठ ठाकूर यांच्या पार्थिवावर न्हावेखाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, कृष्णाशेठ ठाकूर, भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, संजय पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, प्रितम म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, नगरसेवक अजय बहिरा, प्रवीण पाटील, मधु पाटील, नरेंद्र ठाकूर, वासुदेव पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्टांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कान्हाशेठ ठाकूर यांनी आपल्या कार्यातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दिवंगत कान्हाशेठ त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि मोठा परिवार आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper