Breaking News

सराव सामन्यात दिनेश कार्तिकचे झंझावाती अर्धशतक

कोलकाता ः वृत्तसंस्था
आयपीएलसाठी गेल्या काही दिवसांपासून आठही संघातील खेळाडू जोरदार सराव करीत आहेत. यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चादेखील समावेश आहे. केकेआरचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकने सराव सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. संघाने कार्तिकच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोलकाता संघाने खेळाडूंचे दोन संघ केले. या दोन संघांतील अभ्यास सत्रात जोरदार फलंदाजी पाहायला मिळत आहे. काही दिवासंपूर्वी संघातील सलामीवीर शुभमन गिलच्या तडाखेबंद फलंदाजीची चर्चा झाली होती. आता संघातील आणखी एका खेळाडू दिनेश कार्तिकने स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने फक्त 50 चेंडूंत 90 धावा केल्या. दिनेशची ही फलंदाजीपाहून केकेआरचे चाहते खुश झाले आहेत.
गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामात कार्तिकने स्पर्धेच्या मध्येच कर्णधारपद सोडले. त्यानंतर इयान मॉर्गनकडे नेतृत्व देण्यात आले होते. कार्तिकने 2020च्या हंगामात 14 सामन्यांमध्ये फक्त 169 धावा केल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत त्याने 183 धावा केल्या. त्याची सरासरी 61 इतकी होती. तामिळनाडूला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
केकेआरने आतापर्यंत दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. गेल्या वर्षी त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते, पण या वर्षी तिसरे विजेतेपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यासाठी शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोलकाताची पहिली लढत 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply