Breaking News

मुरूड डोंगरी स्वामी समर्थ मठात प्रकट दिन साजरा

गुरुमाऊलीकडून कोरोना निवारणाचे साकडे

मुरुड जंजिरा : प्रतिनिधी

डोंगरी येथील स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींचा प्रगट दिन उत्सहात झाला. विविध उपक्रम व मन्त्रोउपचारात समस्त परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. मठामध्ये दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ये डोंगरी स्वामी मठात गुरुमाऊली  त्रिशताईंनी स्वामींच्या पायाशी कोरोना रोगाचे निवारण होउदे असे साकडे घातले आहे. सामान्य व गरीब लोकांना कोरोना चा मोठा त्रास सहन करावा लागत असून राज्यावर आलेले संकट लवकर विरून जावे व पुन्हा पूर्वीचे दिवस यावे अशी मनोभावे प्रार्थना या वेळी गुरुमाऊली त्रिशा ताई यांनी स्वामींकडे केली आहे.

यावर्षी कोरोना वाढते प्रमाण पाहता मंदिर पूर्णपणे बंद होते. सकाळी गुरुमाऊली त्रिशा ताई यांनी 1000 बिल्वा पत्र अर्पण करून स्वामी महाराजाना प्रार्थना केली आहे.

गुरुमाऊली त्रिशा ताई म्हणाल्या सर्व भक्तांनी कोरोना काळात अतिशय गरजेचे असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये. कोरोना काळात सात्विक आहार घ्यावा. प्रगत दिनी प्रत्यकानी घरी स्वामींचे स्मरण करावे. शासनाने दिलेले नियमांचे पालन करावे असे सांगण्यात आले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply