Breaking News

कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेचे बार्सिलोनाला जेतेपद

माद्रिद ः वृत्तसंस्था
लिओनेल मेस्सीच्या शानदार दोन गोलमुळे बार्सिलोनाने अ‍ॅथलेटिक बिलबाओचा 4-0 असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.
दुसर्‍या सत्रात अवघ्या 12 मिनिटांच्या अंतराने चार गोल लगावत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अँटोनी ग्रिझमन याने 60व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसर्‍याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी 2-0 अशी वाढवली. मेस्सीने 68व्या मिनिटाला आपल्या पदलालित्याच्या जोरावर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर चार मिनिटांनी मेस्सीने आणखी एक गोल करीत बार्सिलोनाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे ग्रामस्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Leave a Reply