Breaking News

खोपोली बाजारात गर्दीचा महापूर; तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर नागरिक रस्त्यावर

खोपोली : प्रतिनिधी 

तीन दिवसांचा झालेला जनता कर्फ्यु व त्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने मंगळवारी (दि. 20) खोपोली बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीने सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा उडविला. त्यामुळे तीन दिवसीय जनता कर्फ्युवर पाणी फेरल्याचे चित्र निर्माण झाले होते. जनता कर्फ्युमुळे खोपोली बाजारपेठ तीन दिवस पूर्णपणे बंद होती. मंगळवारी सकाळी नियमितपणे दुकाने, भाजी, मटण चिकन मार्केट सुरू होताच नागरिकांची प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. रात्री जागोजागी लावण्यात आलेले बांबू व बॅरिगेटिंगमुळे खोपोली शहरात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याचे चित्र निर्माण झाल्याने, कसलीही पर्वा न करता शहरातील नागरिक आवश्यक सामान खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्यामुळे शहरातील भाजीपाला मार्केट, मटण-चिकन मार्केट, फळ मार्केटसह अन्य सर्व ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी तुफान गर्दी झाली. या गर्दीकडून  सोशल डिस्टन्सिंग व कोविड नियमांचा फज्जा उडविला गेला. शेवटी पोलीस व नगरपालिका कर्मचार्‍यांनी फेरफटका मारून गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. मात्र त्याचा फार फरक पडल्याचे दिसले नाही.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply