घरपोच मद्यविक्रीला परवानगी

पनवेल : वार्ताहर

जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार नमुना एफएल-2, फॉर्म इ-2 व एफएलडब्ल्यू-2 मद्यविक्री अनुज्ञप्ती मधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली आहेत. तसेच नमुना सीएल-3 अनुज्ञप्तीमधुक फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्यविक्रीकरता येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

सध्या कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका आहे. त्या अनुषंगाने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या वेळी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील मद्यविक्री करण्याच्या दुकानांतून मद्यविक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे. मात्र रहिवासी सुविधा असलेले हॉटेल आणि इतर सर्व उपहारगृहे व बारमधून घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने मध्य विक्रीच्या दुकानातून मध्य विक्री सुरू ठेवण्याबाबत 19 एप्रिल रोजी शासन आदेश काढण्यात आले.

त्या आदेशांनुसार घरपोच दारू विक्री लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्यांची सुरू ठेवण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकारी व महापालिका हद्दीतीतील सर्व पोलीस ठाण्यांना पत्र दिले आहेत.

विदेशी मद्य किरकोळ विक्रेत्यांनी (एफएल-2) वेळ सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत, देशी मद्याचे किरकोळ विक्रेत्यांनी (सीएल-3) वेळ सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत, सौम्य बिअर व वाईन्सच्या हॉटेलमधून विक्रीसाठी (नमुना ई) वेळ सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत, देशी मद्याचे ठोक विक्रेत्यांसाठी (नमुना सीएल-2) वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सर्व विक्री घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply