Breaking News

पेण येथे 800 खाटांचे कोविड सेंटर

आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश; चार रुग्णवाहिकाही देणार

पेण : प्रतिनिधी

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन   आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यासाठी मोठे कोविड सेंटर उभारण्याकरिता चाचपणी केली होती. त्याला यश आले असून जेएसडब्ल्यू कंपनीच्या ट्रामा सेंटरमध्ये 800 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात  येणार असून चार रुग्णवाहिकाही देणार आहेत.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या डोलवी (ता. पेण) येथील हॉस्पिटलमध्ये आठशे खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. तिला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, त्याबाबतचे आदेश शासनाकडून नुकतेच काढण्यात आले आहेत. आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच या हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कोविड सेंटरमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात कमी होऊन रुग्णांना योग्य ते उपचार वेळीच मिळतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply