पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून उलवे नोडमधील कोपर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या 60 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) सकाळी 11 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोरोना महामारीमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून, त्या अनुषंगाने सोशल मीडियावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण असणार आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper